BMM2026 म्हणजे तुमच्या कलागुणांचा सुंदर देखावा!
BMM 2026 Programming RFP
नमस्कार,

BMM2026, हा प्रतिष्ठित मराठी संमेलन सोहळा, २०२६ मध्ये सिॲटल् येथे संपन्न होणार आहे! या भव्य सोहळ्यात संगीत मैफिली, नाटकं, विनोदी कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, मुलाखती वगैरे असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातील. या अनोख्या अनुभवाचा भाग होण्यासाठी आम्ही उत्तर अमेरिका, भारत आणि परदेशांतील कलाकारांना आपल्या दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव (RFP) सादर करण्याचे निमंत्रण देत आहोत. तुम्ही अनुभवी कलाकार असाल किंवा नवोदित, ह्या स्नेहसंमेलनाच्या प्रतिष्ठीत मंचावर तुम्हाला आपली सुंदर कला सादर करण्याची अनमोल संधी आहे. आणि याद्वारे असंख्य रसिक प्रेक्षकांना तुमच्या कलाकृतींचा आणि सर्जनशीलतेचा मनमुराद आनंद घेता येईल. तर मंडळी, रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी तयार आहात ना?

कृपया खाली दिलेल्या प्रस्ताव सादरीकरण प्रवेशिकेमध्ये तुमच्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती भरा. आमची कार्यक्रम समिती प्रत्येक प्रस्ताव काळजीपूर्वक तपासेल आणि सर्व सहभागी कलाकारांना एक बहारदार आणि अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तत्पर असेल.

कार्यक्रम प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख पुढील प्रमाणे:

भारत व इतर: १५ ऑक्टोबर २०२५ अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर २०२५)
उत्तर अमेरिका: दिवाळी पाडवा (२२ ऑक्टोबर २०२५)

📧 BMM2026 कार्यक्रमांबाबत काही प्रश्न असतील तर आमच्याशी इथे संपर्क साधा: programmingrfp@bmmseattle2026.org

आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

📢 Details regarding block booking, airfare, and hotel booking will be available by November 15, 2025! We are also requesting proposals for Uttarrang and BalTarang-KishoreKunj!