प्रमुख संयोजकांचे निवेदन

नमस्कार!

मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका (BMM) ने सिॲटल् महाराष्ट्र मंडळाची (SMM) २०२६ मधील BMM अधिवेशनाचे/ स्नेहसंमेलनाचे यजमान मंडळ म्हणून निवड केली आहे. १९ वर्षांनंतर हे स्नेहसंमेलन पुन्हा सिॲटल् ला ऑगस्ट ६ ते ९, २०२६ या कालावधीत Seattle Convention Center मध्ये होणार आहे.

२०२४ च्या जून महिन्यात सॅन होजे, कॅलिफोर्निया येथे पार पडलेल्या BMM च्या द्वैवार्षिक स्नेहसंमेलनात ही अधिकृत घोषणा करण्यात आली. या मोठ्या घोषणेनंतर, SMM च्या २०२४ च्या कार्यकारी समितीने (EC) आणि विश्वस्त मंडळाने (BOT) सर्वप्रथम स्नेहसंमेलनाच्या प्रमुख संयोजकांची (Convener) नियुक्ती केली. त्यानंतर मुख्य समिती (Core Committee) तयार केली. मुख्य समितीच्या निवडीनंतर, प्रत्येक संचालन समितीसाठी (Steering Committee) समिती-अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष (Chair and Co-Chair) निवडण्याचे काम सुरु झाले. सध्या आपल्या संचालन समितीत ३१ समित्यांसाठी सुमारे ५५–६० अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष नियुक्त झाले आहेत.

या अधिवेशनाबाबत सिॲटल् आणि आसपासच्या परिसरातील अनेक मराठी कुटुंबांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो आहे, आणि २०० हून अधिक स्वयंसेवकांनी या समित्यांमध्ये सामील होण्यासाठी नोंदणी केली आहे. BMM ही महाराष्ट्राबाहेरील सर्वात मोठी मराठी संस्था आहे, आणि तिचे स्नेहसंमेलन आपल्या शहरात होणे ही सिॲटल् साठी एक मोठी संधी आणि सन्मानाची बाब आहे.

आपण सर्वजण एकत्र येऊ आणि हे स्नेहसंमेलन यशस्वी करू या. उत्तर अमेरिका तसेच जगभरातून येणाऱ्या मराठी बांधवांना एक अविस्मरणीय अनुभव देऊ या!

जय महाराष्ट्र! जय भारत! God Bless America!

- मोहित चिटणीस
प्रमुख संयोजक (Convener), BMM २०२६

प्रमुख संयोजकांचे निवेदन

BMM अध्यक्षांचा संदेश

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन हा एक अवर्णनीय सोहळा असतो. मी आत्तापर्यंत पाच अधिवेशनांना उपस्थिती लावली आहे आणि प्रत्येक वेळी मला छान अनुभव आले आहेत.

एका छताखाली चार ते पाच हजार मराठी माणसे बघायला मिळणे हाच एक सुखावह अनुभव असतो आणि त्यातून तीन दिवस मराठी खाणे, दर्जेदार कार्यक्रम, मित्रमंडळींच्या गाठीभेटी, नव्या ओळखी, जमल्यास काही कलाकारांबरोबर फोटो आणि गप्पा … अजून काय पाहिजे?

लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, तसेच व्यावसायिकांपासून ते उत्तर अमेरिकेतील हौशी कलाकारांपर्यंत, सर्वांना सामावून घेणारे असे हे अधिवेशन - हा विलक्षण अनुभव घेतल्यावर अधिवेशनाच्या प्रेमात नाही पडाल तर नवलच.

जर तुम्ही बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन अनुभवले नसेल तर ऑगस्ट २०२६ ला नक्की सिॲटल् ला या. तुम्हाला भेटायला तसेच तुमचे स्वागत करायला मी उत्सुक आहे. तुम्हाला सस्नेह निमंत्रण!

-प्रसाद पानवळकर
अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४-२०२६)

BMM अध्यक्षांचा संदेश
-नितीन जोशी
-नितीन जोशीविश्वस्त समिती प्रमुख, बृहन्महाराष्ट्र मंडळ (२०२४-२०२६)

बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. मराठी भाषा, संस्कृती आणि कला ह्यांचा त्रिवेणी संगम इथे घडून येतो. मित्रांच्या भेटी, सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन आणि अस्सल मराठी सुग्रास भोजन! ऑगस्ट ६-९, २०२६ रोजी सिॲटल् मध्ये हे बाविसावं अधिवेशन संपन्न होणार आहे. २००७ सालानंतर १९ वर्षांनी सिॲटल्-कर पुन्हाएकदा आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. अमाप उत्साह, कुशल नेतृत्व आणि अभिनव तंत्रज्ञ घेऊन हा सोहळा संपन्न करण्यासाठी २०० हून अधिक स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.

आपल्या मातृभूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्या कर्मभूमीत विखुरलेल्या सर्व मराठी बांधवांची एकजूट इथे अनुभवता येते. चार दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. उत्तररंग, रेशीमगाठी, बी-कनेक्ट हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे उपक्रम, उत्तर अमेरिकेतल्या आणि भारतातल्या कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, विद्वानांची व्याख्याने, सामाजिक कार्याचा गौरव हे सर्व इथेच प्रकाशित होतं.

चला तर मग मंडळी २०२६ मध्ये अधिवेशनाला अवश्य या. आपल्या नात्यांची वीण दृढ करूया, नवीन नाती आणि स्नेह संपादन करूया. हे सर्व तुमच्याचसाठी घडवून आणणाऱ्या सिॲटल्-वासीयांचं मनोगत कविवर्य सुधीर मोघे ह्यांच्या शब्दात सांगतो,

“लखलखणारे हे तारांगण झुकून खाली येईल पळभर तुझियासाठी
सुरलोकीचा कल्पतरूही ह्या मातीतुन रुजून येईल तुझियासाठी”

NA Dance Competitions

स्पर्धांची धमाल, बक्षिसांचा जल्लोष! खास उत्तर अमेरिकेतील स्पर्धकांसाठी!

नृत्यझंकार - उपशास्त्रीय (Semi-classical) नृत्य स्पर्धा.

नाच गं घुमा, नाच रे पोरा - पारंपरिक (Folk ) नृत्य स्पर्धा.

NA Competitions

स्पर्धांची धमाल, बक्षिसांचा जल्लोष! खास उत्तर अमेरिकेतील स्पर्धकांसाठी!

चला मंगळागौर खेळूया! - मंगळागौरीच्या खेळांची स्पर्धा.

नांदा हास्य भरे - मराठी स्टँडअप कॉमेडी स्पर्धा.

Expo

मनोरंजक कार्यक्रम, रुचकर मेजवानी, मित्रमंडळींच्या भेटीगाठी, आणि प्रदर्शनात खरेदी. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे द्वैवार्षिक स्नेहसंमेलन हा अमेरिका आणि कॅनडातील मराठी लोकांचा एक जिव्हाळ्याचा सोहळा. हजारो लोकांची उपस्थिती म्हणजे महाराष्ट्रातल्या उद्योजकांना जाहिरातीची एक नामी संधी. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता यावं यासाठी आम्ही या स्नेहसंमेलनात काही खास योजना केल्या आहेत. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदवून तुमचा सहभाग नक्की करा.

BMM Convention is a premier gathering of people from all over the USA and Canada. Attended by thousands of people, the convention provides a unique opportunity to showcase your venture to potential customers, partners, and supporters. For the 2026 convention we have put together a bouquet of unique packages to choose from. So go ahead take the take the next step to share your business with your fraternity from Maharashtra.

तालश्रेष्ठ वादनोत्सव

ढोल, ताशा, लेझीम, झांज व ध्वज – म्हणजे हिंदवी स्वराज्य, मराठी पराक्रम, इतिहास, संस्कृती, आणि लोककलेचा अभिमान, सन्मान आणि प्रत्येक मराठी समारंभाची शान! सिॲटल् BMM २०२६ स्नेहसंमेलन साजरे करूयात, ढोल ताशाच्या धुमधुमीत, वाजत गाजत, अपार जल्लोषात!

The rhythms, the energy and the passion — it all begins here! The Audition Round is the first of the two rounds of the high-voltage Dhol Tasha Competition of the much-awaited BMM Convention 2026.

We are excitedly inviting all Dhol Tasha Pathaks across North America to showcase their artistry and power packed performances. This is your moment to shine on the grandest Marathi stage in the diaspora and to create lifelong memories for everyone!

स्मरणिका

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०२६ च्या सिॲटल् स्नेहसंमेलनाची तयारी जोमाने चालू आहे आणि आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करायला उत्सुक आहोत. ह्या स्नेहसंमेलनाच्या स्मरणिका समितीकडून तुम्हा सर्व उत्साही लेखक मंडळींना तुमची लेखणी सरसावायला साद देत आहोत. त्याला जरूर प्रतिसाद द्या! लिहिते व्हा! तुमची शब्दकळा आपल्या स्मरणिकेच्या पानांतून बहरू द्या!

खूप दिवसात मनात घोळणारं काही,
खोल खोल रुजलेलं काही!
पाहिलेलं, जाणवलेलं, वाचलेलं, अनुभवलेलं!
हळवं, हसरं आल्हाददायी…
अक्षरातून बरसू दे! लेखणीतून साकार होऊ दे!

मंडळी, विषयाला बंधन नाही… कथा, कविता, लेख, विनोद, पाककृती, शब्दकोडी, ललित, तात्विक, वैचारिक, चिंतनपर, मुक्त अश्या अनेक आयामातून तुमची लेखणी संचार करू देत!

Donation Packages

Experience an unforgettable occasion with our thoughtfully curated donation packages. These packages include accommodations at nearby hotels, comfortable sofa seating, priority seating closer to the main stage, access to VIP and Celebrity dining areas, as well as exclusive participation in the banquet and evening entertainment. Additionally, a limousine service will be available to pick you up from the airport.

If you are not currently interested in a package or are unable to join us for BMM and would still like to support this important cultural event with your donations, please contact us at donations@bmmseattle2026.org and we can send you the bank transfer details. We thank you for your support and would be happy to recognize your contributions on our donor page.

For more details, please click the buttons below.

Programming RFP

BMM2026, हा प्रतिष्ठित मराठी संमेलन सोहळा, २०२६ मध्ये सिॲटल् येथे संपन्न होणार आहे! या भव्य सोहळ्यात संगीत मैफिली, नाटकं, विनोदी कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, मुलाखती वगैरे असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातील. या अनोख्या अनुभवाचा भाग होण्यासाठी आम्ही उत्तर अमेरिका, भारत आणि परदेशांतील कलाकारांना आपल्या दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव (RFP) सादर करण्याचे निमंत्रण देत आहोत. तुम्ही अनुभवी कलाकार असाल किंवा नवोदित, ह्या स्नेहसंमेलनाच्या प्रतिष्ठीत मंचावर तुम्हाला आपली सुंदर कला सादर करण्याची अनमोल संधी आहे. आणि याद्वारे असंख्य रसिक प्रेक्षकांना तुमच्या कलाकृतींचा आणि सर्जनशीलतेचा मनमुराद आनंद घेता येईल. तर मंडळी, रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी तयार आहात ना?

BMM2026 ला भव्य, रंगतदार आणि यशस्वी करण्यासाठी आम्ही तुमच्या प्रस्तावांची आतुरतेने वाट पाहत आहोत!

नाट्यसृजन एकांकिका स्पर्धा

सिॲटल् येथे होणाऱ्या बी एम एम अधिवेशन २०२६ च्या अंतर्गत उत्तर अमेरिकेतील नाट्यकर्मी, रंगकर्मी, आणि नाट्यरसिकांसाठी सादर करीत आहोत मराठी एकांकिका स्पर्धा “नाट्यसृजन”!

मराठी माणूस कुठेही गेला तरी त्याचं नाटकवेड जोपासत असतो. नाट्यकला ही बहुअंगी, बहुपेडी अभिव्यक्ती आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश, ध्वनी, इ. अनेक सृजनशील ऊर्मींना साकार करणारी! एकांकिका हा त्यातला एक आव्हानात्मक आविष्कार असतो. प्रेक्षकांपर्यंत उत्तम कलाकृती पोहोचवायची पण मर्यादित चौकटीत बसवून!

हे आव्हान पेलू शकणारी अनेक गुणवंत कलावंत मंडळींच्या उत्स्फूर्त आणि कसदार सहभागाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहतो आहोत. चला तर मग… लवकरात लवकर आपली प्रवेशिका पाठवा! आपल्या उत्साहाने बहरू दे “नाट्यसृजन”!

BMM 2026 Venue – Seattle Convention Center | Arch Building

Convention Committees

0

BMM Activities Subcommittees

0

Committee Members

0

Volunteers

0

📢 Details regarding block booking, airfare, and hotel booking will be available by November 15, 2025! We are also requesting proposals for Uttarrang and BalTarang-KishoreKunj!