Home/Testimonials

Voices of BMM 2026

बीएमएम २०२६ — मनोगते - बीएमएम २०२६ सिॲटलच्या आठवणी, अनुभव आणि मनापासून व्यक्त झालेली मनोगते.

जपूया संस्कृती, विणूया नाती

बीएमएम २०२६ ची तयारी सुरू झाली म्हणता म्हणता, हे भव्य स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पारही पडले! बीएमएम २०२६ हे केवळ अधिवेशन नव्हते; तो मराठी संस्कृती, आपुलकी, मैत्री, कला आणि स्वयंसेवेचा एक भव्य उत्सव ठरला. चार दिवसांचा हा अविस्मरणीय अनुभव हजारो सहभागींच्या मनात कायमचा घर करून गेला. संमेलनानंतर आम्हाला असंख्य प्रेमळ, उत्स्फूर्त आणि मनापासून दिलेले अभिप्राय मिळाले. प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अभिप्राय पाठवणाऱ्यांनी व्यक्त केलेल्या कौतुकाच्या आणि उत्साहवर्धक शब्दांबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. उपस्थित प्रेक्षक आणि सहभागी कलाकारांच्या काही निवडक प्रतिक्रिया आपल्या सर्वांसाठी.

Thanks to Mohit, Jayant, Subhag and all other volunteers for making the convention a huge success. It was a great experience with awesome programs, delicious food and hospitality. We all had a great time over 3.5 days starting on Day 0. Hope you all relax, feel proud of the effort put in over last 2+ years and reflect on the journey. Best wishes. 🙏🏼

From Mahesh Keni
Platinum donor; from Seattle

Dear Seattle BMM organizers, I want to congratulate you and thank you for the fabulous BMM2026 you put together. The program selections were fabulous and we left Seattle wanting more. Please accept my humble thank you for helping us make these memories, Regards,

From S. Pandhare
Grand Rapids, MI

We just wanted to thank the Seattle team for all your efforts in making the BMM Convention such a nice experience.

From T. Gadre
Clifton, VA

We really enjoyed the BMM convention. Everything (Programs, food, organization, arrangements, planning, accommodations, decorations) was great. All of you volunteers worked hard for 2+ years. Big Thanks to all. Both my LA guests had great time -

From a Bronze donor, Aparna Nadkarni

तालश्रेष्ठ वादनोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल विनय, पराग आणि निखिल यांचे धन्यवाद. संपूर्ण कार्यक्रम अतिशय' उत्कृष्ठ आयोजित केला होता. तुम्हा तिघांनी खूप कष्ट घेतलेत, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! आम्हाला खूप शिकता आलं, मैत्रीची नाती निर्माण झाली, दुसऱ्या पथकांचे अनुभव ऐकता आहे, त्यांचे वादन पाहता आले, खूप छान वाटले. MMM फिनिक्स आणि नादताल अटलांटा या दोनही पथकांचे वादन खूपच सुंदर झाले. अतिशय शिस्तबद्ध, जोशपूर्ण वादन बघून खूप उत्साही वाटलं. दोनही पथकांचे अभिनंदन. आपल्यापैकी कोणाचेही काही कारणाने युटाला येणे झाले तर आवश्य कळवा, नक्की भेटू. तीनही आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा भेटूच.

स्वराज्य ढोल पथक
(तालश्रेष्ठ वादनोत्सव स्पर्धेचे प्रथम पारितोषिक विजेते)

The BMM convention was a great success. The programs were amazing esp. the opening ceremony and The Folk Akhyan musical show. The food was great. Congratulations to Mohit and the whole convention team. We all had a great time. Thanks!

From Raj Angolkar,
Platinum donor, Seattle

बृहन महाराष्ट्र मंडळाचे २२ वे अधिवेशन सिॲटल येथे उत्साहाने पार पडले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन. साहित्य, संगीत, कला, विज्ञान, काव्य, नाट्य,नृत्य, लोकसंगीत आणि वैचारिक भाषणांनी परिपूर्ण असे हे अधिवेशन! मला सर्वात जास्त आवडले ते सिएटलमधील मराठी माणसांचा उत्साह, शिस्त आणि मराठी या ३ अक्षरांवर प्रेम करत निर्व्याज मनाने केलेली मातृभाषेची सेवा! अधिवेशन शब्द व्यवहारी असेल पण संमेलन शब्दातील एकरूपता ३ दिवस मी अनुभवली. ही अमेरिकेत स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेली मराठी माणसे निगर्वी वृत्तीने अमृताला पैजेवर जिंकणाऱ्या भाषेसाठी, तिच्या संवर्धनासाठी झटत होती. आणखी काय लिहू? जिथे मन विचार जुळतात तिथे शब्द विरतात.

डॉ. संजय उपाध्ये
(सुप्रसिद्ध वक्ते, प्रवचनकार)

Namaskar. I thoroughly enjoyed attending, participating and speaking at BMM Seattle 2026.

The organizing team did an impeccable job from planning stages through actual event. I was treated to extreme comfort and ease through all stages, transportation, stay, travel, food and event itself. It was a beautifully organized event and all team members were professional and kind through the entire process. Kudos, thanks and gratitude to the entire BMM Seattle 2026 team.

From Nilesh Oak, the renowned History Researcher and BMM2026 Speaker

बीएमएम २०२६ सिॲटल अधिवेशन हा खरोखरच एक सुंदर, भव्य आणि अविस्मरणीय अनुभव होता. अमेरिकेच्या भूमीवर मराठी मातीचा सुगंध, आपली संस्कृती, परंपरा आणि मराठी अस्मिता जपत, विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा मनाला विशेष भावला. अधिवेशनासाठी निवडलेले प्रशस्त Convention Center, विविध आणि दर्जेदार कार्यक्रमांची सुंदर आखणी तसेच भोजनात रुचकर आणि मोजकेच पदार्थ ठेवण्याची उत्तम संकल्पना यामुळे संपूर्ण अनुभव अधिकच आनंददायी झाला. विशेषतः या अधिवेशनात आयोजित केलेला “स्त्रीत्वाचा सन्मान” हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी होता. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांच्या प्रवासाला व्यासपीठ देण्याचा हा सुंदर प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. जगभरातील मराठी मनांना एकत्र आणणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी बीएमएम २०२६ च्या संपूर्ण टीमचे आणि अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!” ❤️🙏

सौ. प्राजक्ता (Sara) बोंगाळे, U.S. Army
(बीएमएम २०२६ स्त्री सन्मान पुरस्काराच्या मानकरी), शिकागो

The convention was amazing. Some of the programs I attended were exceptional -हसूबाई जोरात, वाद्यसंगम, रेडिओ मैत्री, आरती अंकलीकर, art gallery, artist interviews and live demos, The Folk Aakhyan etc. really good. The loooong planning and efforts are seen throughout. It was fun! Hope you guys get some rest now.

From Prajakta Ghatpande,
Seattle

BMM २०२६ सिॲटल अधिवेशन खरोखर हे चार दिवसांचे हे संमेलन, एका नव्या उंचीवर होते. ५ नाटके, ५ एकांकिका, शास्त्रीय नृत्य, वाद्यवृंद, रेडिओ मैत्री आणि विठ्ठल गाणी यांसारख्या कार्यक्रमांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. आरती अंकलीकर, प्रशांत दामले, ऋषिकेश रानडे, सलील आणि शुभंकर कुलकर्णी यांच्या सादरीकरणांनी रंगत वाढवली. प्रथमच १४ कर्तृत्ववान महिलांचा स्त्रीशक्तीचा गौरव, अभिजात मराठीचा विशेष उत्सव, उत्तर अमेरिकेतील पहिली ज्युरी-आधारित कला स्पर्धा आणि प्रमुख सभागृहांना दिवंगत मराठी महिलांची नावे देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. या अधिवेशनात प्रथमच अधिवेशनाच्या शुभंकरची (moscot) संकल्पना पुढे आली. रेनियर राणी या शुभंकराने सिएटलची ओळख आणि मराठी संस्कृती यांचा सुंदर संगम साधला. मराठी स्टँड-अप कॉमेडी, अवघा रंग एक झाला नाटक, अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आणि विविध प्रदर्शन स्टॉल्स यांनी अधिवेशनाची शोभा वाढवली. एकूणच बीएमएम २०२६ सिॲटल हे सांस्कृतिक, कलात्मक आणि सामाजिक अभिमानाचा अविस्मरणीय सोहळा ठरले.

सौ. चित्रा मेहेंदळे , मुंबई, भारत

बीएमएम २०२६ सिॲटल Day 0 हा एक अतिशय सुंदर आणि संस्मरणीय कार्यक्रमांनी भरलेला दिवस होता!

कार्यक्रमातील वातावरण खूप छान, उत्साहपूर्ण होते. सर्व काही अतिशय उत्तम पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. मुलांचे कार्यक्रम अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने सादर करण्यात आले होते. हा दिवस मुलांसाठी खास बनवण्यासाठी खूप मेहनत आणि विचार करण्यात आला होता, हे स्पष्टपणे दिसत होते. आम्ही व मुलांनी प्रत्येक कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला. हा दिवस यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांचे खूप कौतुक आणि अभिनंदन. Day 0 मुळे बीएमएम अधिवेश नाची सुरुवात अतिशय सुंदर, उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय अशी झाली! 👏😊

रुपाली घाणेकर चौधरी
Seattle WA

बीएमएम २०२६ सिॲटलचा (BMM 2026 Seattle) पहिला दिवस (Day 0) अतिशय सुंदर होता. मुलांना मंचावर सादरीकरण करण्याची ही उत्तम संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उत्तर अमेरिका (NA) एकांकिका पाहणे ही देखील एक पर्वणीच होती. युवा संगीत कार्यक्रम आणि इतर सादरीकरणे खूपच मनोरंजक होती. स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तम आणि नेटके केले होते!

मानसी उपासनी यार्दी Seattle WA

सस्नेह नमस्कार, बीएमएम २०२६ आयोजन समिती आणि सर्व स्वयंसेवक, बीएमएम २०२६ Day 0 हा पालक आणि मुले आम्हा सर्वांसाठीच एक अतिशय सुंदर, उत्साही आणि संस्मरणीय अनुभव ठरला! दीप प्रज्वलन आणि गणेश वंदनेने झालेली मंगलमय सुरुवात, त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा, भाज्यांच्या राज्यात, मधली सुट्टी, होलिका दहन, स्वरसंवादिनी आणि नाट्य सादरीकरण या सर्वच कार्यक्रमांनी मंचावर वेगळीच रंगत आणली. स्थानिक सिॲटलच्या पलीकडे जाऊन इतक्या मोठ्या राष्ट्रीय व्यासपीठावर कला सादर करण्याची संधी मुलांना मिळाली, ही त्यांच्या आत्मविश्वासासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कला सादर करण्यासोबतच नवीन मित्र जोडणे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडले जाणे हा मुलांसाठी अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता. लाईव्ह कार्यक्रमात काही तांत्रिक अडचणी येणे स्वाभाविक असते, पण तंत्रज्ञान आणि बॅकस्टेज टीमने ज्या सहजतेने आणि शांतपणे त्यावर मात करून प्रेक्षकांना उत्तम अनुभव दिला, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. बीएमएम २०२६ ची सुरुवात Day 0 मुळे खऱ्या अर्थाने दिमाखदार आणि अविस्मरणीय झाली! हा दिवस यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व कोऑर्डिनेटर्स, शिक्षक आणि स्वयंसेवकांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक! 👏😊 मनःपूर्वक धन्यवाद,

शुभांगी आणि संदीप शहाणे , Seattle, WA

संपूर्ण प्रक्रियेत उत्कृष्ट समन्वय आणि शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक प्रश्नाला संयमाने उत्तरे दिल्याबद्दल नाट्यसृजन एकांकिका स्पर्धा टीमचे मनःपूर्वक आभार. आता थोडी विश्रांती घ्या, लवकरच पुन्हा भेटू!"

टीम अभिव्यक्ती, लॉस एंजेलिस

बीएमएम दरम्यान दिलेल्या सहकार्याबद्दल आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. तुमच्यामुळे आमचे काम खूप सोपे झाले. नाट्यप्रेमींसाठी असे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

टीम अमृत निर्मिती, वॉशिंग्टन डी.सी.

उत्कृष्ट नियोजन, सुरळीत एकांकिका स्पर्धा आणि सुंदर व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण नाट्यसृजन टीमचे आभार. तुमच्या परिश्रमामुळे हा अनुभव अविस्मरणीय ठरला!

बेसमेंट थिएटर, शिकागो

Hi Parag, Sanjay and Prasanna, Our entire team is back in NJ except us, we are spending 1 week at Mt Rainier, Olympic and North Cascades. Thank you for your hospitality and hard work in making not only this but other shows possible. We also have been receiving positive feedbacks. Hope people overall liked the play. Ultimately what matters is the Tagline of BMM- जपूया संस्कृती विणूया नाती! Stay in touch.

Sukhi Manasacha Sadara Team, Abhijat Kala Mandali, New Jersy

Dear Parag, Shailesh, and Subhag, Just now landed in Raleigh. Many thanks for hosting and your help in staging this play at the convention. It was an awesome experience. Please let us know if you would be in the vicinity of Raleigh and I would love to meet up.Looking forward to staying in touch, Cheers,

Madhav Manjrekar,
From Mahanirvan Natak team, Raleigh

संमेलनात सगळे छान झाले . मला संमेलनाचे पुस्तक 'गोफ' मिळाले, माझी रेसिपी व विनोद छापून आले आहेत , पुस्तक फारच सुंदर छापले आहे.

सौ. रेखा पै, सिॲटल

It was a well organized BMM with wonderful programs, yummy food and great company of friends and family. We had a blast in those 4 days. Thanks to you and all the organizers for doing such a fabulous job. We could see the hard work you all put into, to make it a success. Hope you all are getting some well needed rest. Thanks again for all your help 🙏🏼🙏🏼

From one more Platinum donor, Seattle

BMM Swarmanch 2026 was a blast. Thanks to all the wonderful participants, hosts, and judges! ❤️ It was such a valuable experience listening to other talented singers, sharing the stage with renowned musicians, and receiving feedback from Dr. Saleel Kulkarni and Hrishikesh Ranade, truly such an honor.Huge thanks to Sheetal Patwardhan & Amit Kulkarni for all your efforts in putting this show together! And congrats to all participants!! 🎉

From one of the participants of Swarmanch, Singing Competition

अधिवेशन अत्यंत उत्तम प्रकारे पार पडले. एवढा मोठा कार्यक्रम म्हटला की काही त्रुटी असणारच, पण मला सर्वात भावले ते म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकाच्या चेहऱ्यावर कायम दिसणारे हास्य. इतका शारीरिक आणि मानसिक ताण असूनही कोणीही वैतागलेले किंवा चिडलेले दिसले नाही. प्रत्येक स्वयंसेवक उत्साहाने, हसतमुखाने मदत करत होता, विचारपूस करत होता आणि सर्वांची काळजी घेत होता.

एक प्रेक्षक, डेन्व्हर

शनिवारचे ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजक आणि सहभागी स्पर्धक पथकांचे ढोल-ताशा जॅमिंग वादन अत्यंत सुंदर झाले. मैत्री, एकता आणि आपल्या संस्कृतीवरील प्रेमाचे ते एक उत्तम सादरीकरण होते. आर्ट गॅलरीचा डेमो देखील अतिशय सुंदर झाला. आर्ट गॅलरीमधील चित्रे खरोखरच अप्रतिम होती. संपूर्ण संमेलन अतिशय उत्तम प्रकारे पार पडले.

एक कलाप्रेमी प्रेक्षक, सिॲटल

I just wanted to congratulate your committee on amazing musical program line up. I think all of them were a treat! Thank you

From Deepa Galande,
Seattle

- Aditya Ranade’s performance was mesmerizing that day. Each and every song from start to finish. Thanks for bringing that program to us.

- This is my best gift from BMM 2026 !!!

- Congratulations and thank you for putting local talent on main stage as part of Swarmanch !!! Thank you !!!!

- BMM Swarmanch was an absolutely unforgettable experience! The seamless coordination, constant communication, and incredible efforts by Sheetal Patwardhan and Amit Kulkarni made it truly special. With Saleelji’s guidance and the support of outstanding musicians, the songs came alive beautifully. Kudos to all the co-performers for their inspiring performances!

From many Participants and Audience of Swarmanch, the singing competition.

बीएमएम २०२६ सिॲटल अधिवेशन म्हणजे अमेरिकेत अनुभवलेला एक भव्य आणि सुंदर मराठी सोहळा! Seattle Convention Center सारखे उत्कृष्ट ठिकाण, विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या दर्जेदार कार्यक्रमांची सुरेख आखणी, तसेच भोजनामध्ये रुचकर पण मोजक्याच पदार्थांची विचारपूर्वक निवड या सर्वांमधून आयोजकांचे उत्तम नियोजन आणि मेहनत जाणवत होती. या अधिवेशनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करून त्यांचे विचार आणि अनुभव मराठी समाजापर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न. कला, संस्कृती, समाजसेवा, व्यवसाय, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांमुळे अधिवेशनाची उंची निश्चितच वाढली. मला विशेष भावलेली गोष्ट म्हणजे “स्त्रीत्वाचा सन्मान” हा उपक्रम. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची ही संकल्पना खरोखरच स्तुत्य होती. अशा उपक्रमांमुळे केवळ कर्तृत्वाचा सन्मान होत नाही, तर पुढच्या पिढीलाही प्रेरणा मिळते. हजारो मैल दूर असूनही आपल्या मराठी मातीशी असलेली नाळ किती घट्ट आहे, याची पुन्हा एकदा अनुभूती या अधिवेशनाने दिली. संपूर्ण BMM टीम, सिॲटल महाराष्ट्र मंडळ, आयोजक आणि अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! 👏🙏

श्री. समीर बोंगाळे. Former President, Maharashtra Mandal Chicago

Moments from BMM 2026

बीएमएम २०२६ मधील काही खास क्षण

जपूया संस्कृती, विणूया नाती !!! 🙏🌸

अश्विनी क्षीरसागर, (बीएमएम२०२६ समिती)